
वरवे खुर्दमधील मुख्य रस्त्याची चाळण
नसरापूर, ता.२६ : वरवे खुर्द (ता.भोर) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे २०२१ मध्ये झालेला गावातील मुख्य रस्त्यावर अवघ्या एका वर्षातच मोठ मोठ्ठे खड्डे पडले आहेत. निकृष्ठ दर्जाच्या कामाचा नुकताच सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी निषेध केला व रस्त्याची त्वरित दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
निकृष्ठ कामाच्या निषेधासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश भोरडे, उपसरपंच आशिष भोरडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र भोरडे, रणजित कांबळे, सागर कोंडे, प्रकाश भोरडे, तुषार भोरडे, समीर भोरडे, उमेश खोंडगे आदी तरुण ग्रामस्थांनी रस्त्याच्या खड्ड्यालगत बसून निषेध केला आहे. याबाबत महेंद्र भोरडे यांनी माहिती ''सकाळ''शी बोलताना सांगितले कि, वरवे खुर्द गावासाठी महामार्ग ते साठवण तलाव या सुमारे दोन किलोमीटर अंतरातील रस्ता एक कोटी ६० लाख रुपये खर्चून तयार केला आहे. निकृष्ठ दर्जाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी वारंवार ठेकेदाराला जाब विचारून कामाचा दर्जा सुधारण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत काम पूर्ण केले. आता पहिल्या रस्त्यावर मोठ मोठ्ठे खड्डे पडले असून, काम पूर्णत्वानंतर पाच वर्षे देखभालीची जबाबदारी असताना देखील ठेकेदार दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे.
रस्ता अनेक ठिकाणी खचलेला आहे हाच रस्ता रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने नागरिकांना या खराब रस्त्याचा खूप त्रास होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असून हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्याची मागणी केली आहे अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्रा घेण्यात येईल. मराठी
- महेंद्र भोरडे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक
02612
Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01449 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..