यंत्राद्वारे भात लागवडीचे कामथडी येथे प्रात्यक्षिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंत्राद्वारे भात लागवडीचे कामथडी येथे प्रात्यक्षिक
यंत्राद्वारे भात लागवडीचे कामथडी येथे प्रात्यक्षिक

यंत्राद्वारे भात लागवडीचे कामथडी येथे प्रात्यक्षिक

sakal_logo
By

नसरापूर, ता.३१ : शेतकऱ्यांनी यंत्राव्दारे भात लागवड करून उत्पादन खर्चात बचत करावी, असे आवाहन भोर तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी येथे केले.

कामथडी (ता.भोर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक कामथडी येथील शेतकरी राहुल इंगुळकर यांच्या शेतावर राबविण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी सांगितले कि, भात हे भोर तालुक्यातील प्रमुख पीक आहे, भात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते परंतु सध्या मजुरांची कमतरता जाणवते. योग्य पाऊस झाला की प्रत्येक शेतकऱ्याची भात लागवडीची लगबग सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात लागवडीचा अवलंब करावा, यामुळे खर्चात बचत होते व उत्पादनात वाढ होते.
माजी सभापती लहुनाना शेलार यांनी यावेळी यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे होणारे फायदे याची माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे यांनी यंत्राद्वारे भात लागवड करण्यासाठी रोपवाटिका कशी तयार करावी. याबाबत माहिती दिली, तसेच भात लागवड यंत्र खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन केले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, नसरापूर मंडल कृषी अधिकारी, राजेंद्र डोंबाळे, कृषी पर्यवेक्षक ज्ञानदेव गोरवे, कृषी सहायक राहुल दिघे, विष्णू शिनगारे हे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01459 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..