कंटेनरला ट्रकची धडक; चालकाचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंटेनरला ट्रकची धडक; चालकाचा जागीच मृत्यू
कंटेनरला ट्रकची धडक; चालकाचा जागीच मृत्यू

कंटेनरला ट्रकची धडक; चालकाचा जागीच मृत्यू

sakal_logo
By

नसरापूर, ता.३१ पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ (ता. भोर) येथे चुकीच्या पद्धतीने पाइपची वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधील पाइप न दिसल्याने ट्रकची पाईपला धडक बसली. यामुळे झालेल्या अपघातात शुक्रवारी (ता. ३०) ट्रक चालक पांडुरंग जाधव (वय ३९ रा.शिरुपी ता.जि.बेळगाव कर्नाटक) यांचा जगीच मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर चालक सोपान रामू सपकाळ (रा. मुंबई) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अजय सुनील पवार (वय २९ रा.कात्रज) यांनी फिर्याद आहे.
या अपघातात ट्रकचालक सिध्दार्थ पांडुरंग जाधव (वय ३९ रा.शिरुपी ता.जि.बेळगाव कर्नाटक) हे मृत्यमुखी पडले. कापूरहोळ येथे
साताऱ्याकडे जाणारा कंटेनर लोखंडी मोठा पाइप भरुन रिफ्लेक्टर न लावता महामार्गाच्या लेन ३ वरुन जाण्या ऐवजी क्रमांक १ च्या लेन मधून जाता होता. यावेळी ट्रक चालक सिध्दार्थ जाधव यांना अंधारात कंटेनरमधील पाइप न दिसल्याने त्यांचा ट्रक कंटेनरमधील पाईपला जोरदार धडकला. यामुळे कंटेनरमधील पाइप ट्रकच्या केबिनमध्ये घुसले. यामुळे ट्रक चालक जाधव यांचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01460 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..