नागरिकांना राष्ट्रध्वजाची संहिता सांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांना राष्ट्रध्वजाची संहिता सांगा
नागरिकांना राष्ट्रध्वजाची संहिता सांगा

नागरिकांना राष्ट्रध्वजाची संहिता सांगा

sakal_logo
By

नसरापूर, ता.७ : ''हर घर तिरंगा'' मोहिमेअंतर्गत पोलिस पाटलांनी नागरिकांना तिरंग्याबाबत राष्ट्रध्वज संहिता नागरिकांना समजावून सांगून तिरंग्याचा कोठेही अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी,'''' असे आवाहन राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांनी केले.
हर घर तिरंगा मोहीम राबवताना राष्ट्रध्वज तिरंग्याबाबतचे नियम सर्वांना माहिती व्हावेत यासाठी राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस पाटील यांची बैठक आज राजगड पोलिस ठाण्यात पार पडली. यावेळी पाटील, उपनिरीक्षक संजय सुतनासे,पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुरेश चव्हाण,पोलिस कर्मचारी तसेच सर्व पोलिस पाटील उपस्थित होते.
या बैठकीत उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी राष्ट्रध्वजा संबंधीच्या नियमांची माहिती देताना १३ ते १५ ऑगस्ट हे तीन दिवस प्रत्येक घरात तिरंगा फडकवला जाणार आहे. १३ तारखेला सूर्योदयानंतर झेंडा फडकावला गेला पाहिजे. तीन दिवस हा झेंडा राहणार असून दररोज संध्याकाळी तो उतरवण्याची आवश्यकता नाही. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर तो सन्मानाने उतरवला पाहिले.
पाटील पुढे म्हणाले, की प्लास्टिक किंवा कागदी तिरंगा फडकावला गेला नाही पाहिजे. कोणत्याही संस्था किंवा राजकीय पक्षाला त्यांचा झेंडा लावायचा झाल्यास तो तिरंग्याच्या डाव्या बाजूस तसेच तिरंग्या पेक्षा कमी उंचीवर लावला गेला पाहिजे. त्याचा अवमान होता कामा नये, यासाठी पोलिस पाटलांनी नागरिकांना योग्य माहिती द्यावी.
या बैठकीत पोलिस पाटील पदावरुन निवृत्त होत असलेले हिंगे वाठार येथील पोलिस पाटील विलास हिगें पाटील यांच्या निरोप समारंभानिमित्त त्याचा सन्मान पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

02643

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01465 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..