उंबऱ्यात काळभैरवनाथ पॅनेलचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंबऱ्यात काळभैरवनाथ पॅनेलचे वर्चस्व
उंबऱ्यात काळभैरवनाथ पॅनेलचे वर्चस्व

उंबऱ्यात काळभैरवनाथ पॅनेलचे वर्चस्व

sakal_logo
By

नसरापूर, ता.९ : उंबरे-खडकी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत १२ पैकी ११ जागा जिंकत श्री काळभैरवनाथ सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. श्री जानुबाई सहकारी पॅनेलला एक जागेवर समाधान मानावे लागले आहे.
उंबरे व खडकी (ता.भोर) या दोन गावची मिळून असलेल्या या सहकारी सोसायटीत १३ संचालक असून एक जागा रिक्त राहिल्याने १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीतकाळभैरवनाथ पॅनेलविरुध्द जानुबाई पॅनेल यांची लढत झाली. यामध्ये काळभैरवनाथचे दत्तात्रेय सर्जेराव खुटवड, ज्ञानोबा दिनकर झेंडे, पंढरीनाथ सर्जेराव खुटवड, अरुण हरीभाऊ खुटवड, संतोष कोंडिबा बांदल, सुनील साहेबराव खुटवड, जालिंदर साहेबराव खुटवड, कलावती अनिल म्हस्के, सविता तानाजी खुटवड, मनोहर बाळासाहेब देवकर, बाबासाहेब नामदेव खुडे हे अकरा संचालक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर श्री जानुबाई पॅनेलचे बाजीराव पांडुरंग खुटवड हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.
विजयानंतर काळभैरवनाथ पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला.
निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोर तालुका सहायक निबंधक बाळासाहेब तावरे तर सहायक म्हणून सचिव विजय पवार यांनी काम पाहिले.

02650

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01469 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..