कुरंगवडीतून शिवसैनिकाच्या निष्ठायात्रेचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरंगवडीतून शिवसैनिकाच्या निष्ठायात्रेचा प्रारंभ
कुरंगवडीतून शिवसैनिकाच्या निष्ठायात्रेचा प्रारंभ

कुरंगवडीतून शिवसैनिकाच्या निष्ठायात्रेचा प्रारंभ

sakal_logo
By

नसरापूर, ता.२९ : कुरंगवडी (ता.भोर) येथील शिवसैनिक राजेंद्र विठ्ठल शिळीमकर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा व्यक्त करण्यासाठी कुरंगवडी ते मुंबई मातोश्री बंगला सायकलवर प्रवास करत निष्ठायात्रा सुरू केली आहे. शिवसेना जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांच्या हस्ते सायकलचे पूजन करून आज (ता.२९) यात्रेचा कुरंगवडी येथून प्रारंभ करण्यात आला.

राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत. हे सांगण्यासाठी शिवसैनिक शिळीमकर यांनी सायकलवरुन मातोश्री जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या भूमिकेला कुरंगवडी ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. सायकल पूजन व राजेंद्र शिळीमकर यांचा सत्कार करून त्यांच्या निष्ठा यात्रेला रवाना करण्यात आले. यावेळी सतीश शिळीमकर, अनिल ननावरे, दिनेश शिळीमकर, शेखर शिळीमकर, रामादादा शिळीमकर, सचिन शिळीमकर, राहुल शिळीमकर, दौलत कांटे यांच्यासह कुरंगवडी ग्रामस्थ उपस्थित होते.

निष्ठायात्रेवर निघालेल्या राजेंद्र शिळीमकर यांचे रस्त्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी स्वागत करून निष्ठा यात्रेस शुभेच्छा दिल्या तर नसरापूर येथे शिवसैनिक माजी सरपंच प्रकाश चाळेकर, उत्तम निकम, गौरव जंगम, संजय उकिर्डे, प्रदीप शेटे, अंकुश ढेकाणे आदी शिवसैनिकांनी शिळीमकर यांचे स्वागत करून सत्कार केला.

महाराष्ट्रातील बंडखोरीच्या राजकारणाने अनेक शिवसैनिक अस्वस्थ झाले असून, शिवसेनेतून वेगळा गट करणाऱ्या आमदारांबद्दल सामान्य शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. राज्याला लाभलेल्या संयमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अशाप्रकारे पदावरून हटवणे सामान्य शिवसैनकांना आवडलेले नसून, सामान्य शिवसैनिक त्यांच्या मागे ठाम आहेत.
- राजेंद्र शिळीमकर

02698

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01495 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..