नसरापूरमध्ये मिरवणूक रथांना फुलांची सजावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नसरापूरमध्ये मिरवणूक रथांना फुलांची सजावट
नसरापूरमध्ये मिरवणूक रथांना फुलांची सजावट

नसरापूरमध्ये मिरवणूक रथांना फुलांची सजावट

sakal_logo
By

नसरापूर, ता. ९ ः नसरापूरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी फुलांच्या आकर्षक सजावट केलेल्या रथामध्ये तसेच बॅन्ड पथक व डिजेच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढून गणरायाला निरोप दिला.
नसरापूरमध्ये घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळातील गणेशाला उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला. नागरिकांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात समुहाने जात येथील शिवगंगा नदीमध्ये गणेश विसर्जन केले. यावेळी नदीकिनारी मोठी गर्दी होती. भावपूर्ण वातावरणात आरत्या म्हणत गणरायाला निरोप देण्यात आला.
सायंकाळी सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन ढोलताशा, बँड व डिजेच्या तालावर झाले. यावेळी येथील श्री भैरवनाथ तरुण मंडळाने शिवशंकराच्या मोठ्या डमरुच्या आकाराची फुलांची सजावट रथावर करून मिरवणुक काढली होती. मंडळाचे अध्यक्ष अमोल दळवी, ग्रामपंचायत सदस्य सुधीर वाल्हेकर व सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती.
येथील श्रीकृष्ण मित्र मंडळाने देखिल फुलांची आकर्षक सजावट केलेल्या रथावर गणेश मूर्ती ठेऊन रथासमोर बँड पथकाच्या निनादात गुलाल विरहित शांततेत मिरवणुक काढली. मंडळाचे कार्यकर्ते अमित राऊत व सर्व सक्रिय कार्यकर्त्यांनी सजावटीचे नियोजन केले होते. शिवराज मित्र मंडळाने देखिल फुलांची सजावट करून डिजेच्या तालावर मिरवणूक काढून गणरायाला निरोप दिला. मंडळाच्या सर्व सक्रिय कार्यकर्त्यांनी या सजावटीसाठी मेहनत घेतली होती.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01502 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..