साळवडेच्या तंटामुक्त अध्यक्षपदी विशाल जाधव यांची फेरनिवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साळवडेच्या तंटामुक्त अध्यक्षपदी
विशाल जाधव यांची फेरनिवड
साळवडेच्या तंटामुक्त अध्यक्षपदी विशाल जाधव यांची फेरनिवड

साळवडेच्या तंटामुक्त अध्यक्षपदी विशाल जाधव यांची फेरनिवड

sakal_logo
By

नसरापूर, ता. १३ ः साळवडे (ता. भोर) गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मागील वर्षीचे अध्यक्ष विशाल जाधव यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

जाधव यांनी मागील वर्षी तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून काम करत असताना गावामधील जास्तीजास्त तंटे मिटविण्यासाठी, तसेच नव्याने तंटे निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याने ग्रामसभेत यावर्षीसाठी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी जाधव यांची फेरनिवड करण्यात आली.

यावेळी समिती सचिव ग्रामसेवक अभिय निकम, सरपंच माया भडाळे, उपसरपंच सागर तांबट, पोलिस पाटील गणपत जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदीप खुळे, पुष्पा शेडगे, दीपक तांबट, महेंद्र सणस, बापू भडाळे, संतोष कोंडे, अमित सुतार व ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01506 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..