`राजगड`चे सव्वातीन लाख गाळपाचे उद्दिष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

`राजगड`चे सव्वातीन लाख गाळपाचे उद्दिष्ट
`राजगड`चे सव्वातीन लाख गाळपाचे उद्दिष्ट

`राजगड`चे सव्वातीन लाख गाळपाचे उद्दिष्ट

sakal_logo
By

नसरापूर, ता.१४ : "राजगड सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ या गळीत हंगामासाठी सव्वातीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे,'''' असे मिलरोलरच्या पूजनप्रसंगी
कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव सुके यांनी सांगितले.
राजगड कारखान्याने चालू हंगामातील गाळपासाठी तयारी सुरू केली असून, कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे मिलरोलर पूजन उपाध्यक्ष सुके यांच्या हस्ते झाले.
यावेळी सुके यांनी सांगितले कि, या गळीत उद्दिष्टासाठी ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्र नोंदीचे उद्दिष्ट ठरवविले आहे. यापैकी ३ हजार २३९ हेक्टरची नोंद झाली असून, उर्वरित क्षेत्र नोंदी सुरू आहेत. तोडणी व वाहतुकीचे नियोजन देखील केले आहे. यासाठी १०० टँक्टर, ५० ट्रक, १०० युवराज वाहने, ६ हार्वेस्टरचे करार पूर्ण झाले आहेत. अगाऊ रकमेचे वाटप देखील करण्यात येत आहे.
कारखाना स्वयुंपुर्णतेकडे वाटचाल करीत असून शेतकरी सभासद व कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी संचालक मंडळाने ऊस लागवडीवर भर देऊन कारखाना आधुनिकीकरणा मध्ये गाळप क्षमता १,२५० वरून ३,५०० टन वाढ करणार आहे. या बरोबरच ४५ केएलपीडी क्षमतेची डिस्टिलरी १८ मेगावँट क्षमतेचा को जनरेशन प्रकल्प, उभारण्यासाठी औद्योगिक प्रमाणपत्र व इतर परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे माहिती सुके यांनी दिली. गाळपासाठी ऊस उत्पादकांनी कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी माजी उपाध्यक्ष विकास कोंडे, शिवाजीराव कोंडे, दिनकराव धरपाळे, प्रताप शिळीमकर, सुधीर खोपडे, दत्तात्रेय चव्हाण, अशोक शेलार, सुरेखा निगडे, कार्यकारी संचालक सुनील महिंद्र, कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

02730

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01509 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..