नसरापूर येथील ‘तनिष्कां’चे अर्थमंत्री सीतारामन यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नसरापूर येथील ‘तनिष्कां’चे
अर्थमंत्री सीतारामन यांना निवेदन
नसरापूर येथील ‘तनिष्कां’चे अर्थमंत्री सीतारामन यांना निवेदन

नसरापूर येथील ‘तनिष्कां’चे अर्थमंत्री सीतारामन यांना निवेदन

sakal_logo
By

नसरापूर, ता. २५ : ‘‘मॅडमजी, आपकी मोदी सरकार का राष्ट्रीय मुद्दोंपर अच्छा काम है लेकीन आम जनता को उससे कुछ लेना देना नही है, उनकी रोजीरोटी उनके लिये बहुत मायने रखती है और वही आज महंगी हो गयी है, कृपा करके महंगाई कम करो’’ अशी भावनिक साद घालत नसरापूर येथील तनिष्का महिला व्यासपीठ सदस्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देऊन महागाई कमी करण्याची विनंती केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भोर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना वरवे (ता. भोर) येथील कार्यक्रमात त्यांना नसरापूर येथील तनिष्का व्यासपीठ सदस्यांनी भेटून हिंदीमध्ये निवेदन दिले. निवेदनामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधानांनी सर्व देशात एकच करप्रणाली लागू करून अर्थव्यवस्था बळकट केली ही चांगली बाब असून उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत प्रत्येक घरात गॅस पोचवला आहे. परंतु एका हाताने गॅस देत दुसऱ्या हाताने गॅसची सबसिडी बंद करून गॅसच्या किमती ११०० रुपयांपर्यंत नेऊन ठेवल्याने सर्वसामान्यांना पुन्हा चुलीकडे वळावे लागले आहे. तसेच पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, आतापर्यंत कर नसलेल्या अन्नधान्य व दूध तसेच दूध उत्पादनावर कर लावल्याने सामान्य नागरिक महागाईने हैराण झाला आहे. त्यामध्ये ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ या अनियमित निसर्गाच्या फेऱ्याने शेतकरी हैराण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजादेखील नीट भागल्या जात नाहीत. घरकूल आवास योजनादेखील सर्वांना मिळत नाही. सर्वसामान्यांसाठी प्रथम महागार्ई कमी करून दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. तसेच या विनंतीचा आपण निश्चित विचार कराल असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी तनिष्का व्यासपीठाच्या वैशाली झोरे, नीता शेटे, स्मिता विभुते, कविता हाडके, ज्योती कोंडे, निकिता जंगम, छाया बांदल या महिला उपस्थित होत्या.