
प्रकल्पग्रस्त गावांसाठी आठ कोटीचा निधी
नसरापूर, ता.२७ : भाटघर व वीर धरण प्रकल्पातील बाधित गावांच्या नागरी सुविधांसाठी दुसऱ्या टप्प्यातील अंतिम कामांसाठी सुमारे सात कोटी ८४ लाख ५० हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी भाटघर प्रकल्पग्रस्त सेवा संघ व वीर धरणप्रकल्प सेवा संघाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याची माहिती भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे.
भाटघर व विर धरण प्रकल्पामुळे पुर्नवसित झालेल्या भोर वेल्हे तालुक्यातील गावांच्या विकासासाठी आमदार थोपटे व दोन्ही प्रकल्पग्रस्त सेवा संघाचे सातत्याने प्रयत्न सुरू असून, त्यामुळे नुकत्याच दुसऱ्या टप्प्यातील अंतिम कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी त्यांनी सांगितले कि, २०१३-१४ मध्ये तत्कालीन पुनर्वसनमंत्री कै. पतंगराव कदम यांनी १६ कोटी ३९ लाख २१ हजार एवढ्या रकमेचा निधी मंजूर केला होता. त्या पैकी ६ कोटी१४ लाख रुपयांच्या कामास सुधारित मान्यता मिळवण्याच्या प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असून, त्याही कामांना समितीच्या बैठकीत लवकरच मंजुरी मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रशासकीय मान्यता मिळालेल्या गावाचे नाव :
भाटघर प्रकल्पातील गावे
भाटघर-स्मशानभुमी रस्ता ३० लाख, अंतर्गत काँक्रिटीकरण १० लाख,समाजमंदिर बांधणे २० लाख, कुंबळे- समाजमंदिर बांधणे १५ लाख, गृहिणी समाजमंदिर बांधणे १५ लाख, बालवड (ता.वेल्हे) येथील रस्ता ६० लाख व समाजमंदिर बांधणे १५ लाख.
वीर प्रकल्पातील गावे-
आळंदे- रस्ता डांबरीकरण ४० लाख, समाजमंदिर बांधणे ४० लाख. कासुर्डी गु.मा.- स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरण ४० लाख, भांबवडे- रस्ता काँक्रिटीकरण व बंदीस्त गटार ४३ लाख, राजापूर- गावठाण रस्ता डांबरीकरण ५० लाख, पांडे-गावठाण रस्ता डांबरीकरण ४० लाख, समाजमंदिर बांधणे १५ लाख, सारोळा ते सावरदरे येथील बापदेव रस्ता डांबरीकरण १५ लाख, सारोळा समाजमंदिर बांधणे ३० लाख, सारोळा रस्ता काँक्रिटीकरण ५२ लाख, काळेवाडी- पोहच रस्ता २५ लाख, केंजळ- धांगवडी पोहच रस्ता ८० लाख, धांगवडी- रस्ता काँक्रिटीकरण व गटार बांधणे ३९.५० लाख, निगडे- समाजमंदिर २० लाख, अंतर्गत रस्ता बंदिस्त गटार ३० लाख, इंगवली- रस्ता डांबरीकरण ४० लाख, काळेवाडी पूल रस्ता डांबरीकरण २० लाख.