चालकाचे नियंत्रण सुटल्याने आराम बसची ट्रेलरला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालकाचे नियंत्रण सुटल्याने आराम बसची ट्रेलरला धडक
चालकाचे नियंत्रण सुटल्याने आराम बसची ट्रेलरला धडक

चालकाचे नियंत्रण सुटल्याने आराम बसची ट्रेलरला धडक

sakal_logo
By

नसरापूर, ता.८ : सातारा-पुणे महामार्गावर सारोळा (ता.भोर) येथे पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव आराम बसच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे बस रस्त्याची सातरा-पुणे ही लेन पार करून पलीकडे उभ्या असलेल्या ट्रेलरवर जाऊन जोरदार धडकली. यामुळे झालेल्या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी (ता.८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघातात बसमधील शमशात अजमतअली खान, नाहीरा नूर अहमद, सुधीर संजय साळुंखे, मनोज चैथीलाल जाटप व मारीया (पूर्ण नाव माहिती नाही) हे सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. मुंबईकडे जाणारी आराम सारोळा येथून भरधाव वेगात जात असताना चालक भरत भूषण पुजारी याचा बस वरील ताबा सुटल्याने बस विरुद्ध दिशेला जाऊन पलीकडील सेवा रस्त्यावर थांबलेल्या ट्रेलरला धडकली. या अपघाताबाबत प्रवासी फिरोज खोजा आत्तार (वय ३९ रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. बसचालक भरत भूषण पुजारी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे


02802