पांडे ः प्रा. नामदेवराव जाधव यांचे तरुणांसाठी उद्योजकता मार्गदर्शनपर व्याख्यान ‘नोकरदार न होता उद्योजक व्हावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांडे ः प्रा. नामदेवराव जाधव यांचे तरुणांसाठी उद्योजकता मार्गदर्शनपर व्याख्यान
‘नोकरदार न होता उद्योजक व्हावे’
पांडे ः प्रा. नामदेवराव जाधव यांचे तरुणांसाठी उद्योजकता मार्गदर्शनपर व्याख्यान ‘नोकरदार न होता उद्योजक व्हावे’

पांडे ः प्रा. नामदेवराव जाधव यांचे तरुणांसाठी उद्योजकता मार्गदर्शनपर व्याख्यान ‘नोकरदार न होता उद्योजक व्हावे’

sakal_logo
By

नसरापूर, ता. १४ : मराठी तरुणांनी नोकरदार न होता उद्योजक म्हणून करिअर घडवावे. यासाठी मावळी जवान संघटनेचे भोर तालुका अध्यक्ष वैभव धाडवे पाटील यांच्या मित्रमंडळाच्या वतीने पांडे (ता. भोर) येथील शिवमंगल लाँन्स मंगल कार्यालयात तरुणांसाठी उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे.
रविवार (ता. १६) रोजी दुपारी चार वाजता होणाऱ्या या मेळाव्यात व्याख्याते प्रा. नामदेवराव जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, महिला बचत गट अभियानाचे व्यवस्थापक दिलीप चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याबाबत माहिती देताना धाडवे म्हणाले की, भोर वेल्हे तालुक्यात उद्योगासाठी पोषक वातावरण असतानाही औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या नाहीत. छोट्या मोठ्या उद्योगाचीही निर्मिती झाली नाही. राजकीय उदासिनतेकडे दुर्लक्ष करून स्वतः चा व्यवसाय किंवा उद्योग उभा करता येऊन प्रगती साधता येते. त्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, हे ओळखून या शिबीराचे आयोजन केले आहे. तरुणांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.