धांगवडीत बीएसएनएल मनोऱ्याच्या बॅटऱ्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धांगवडीत बीएसएनएल मनोऱ्याच्या बॅटऱ्यांची चोरी
धांगवडीत बीएसएनएल मनोऱ्याच्या बॅटऱ्यांची चोरी

धांगवडीत बीएसएनएल मनोऱ्याच्या बॅटऱ्यांची चोरी

sakal_logo
By

नसरापूर, ता. ४ : धांगवडी (ता. भोर) येथे बीएसएनएल मोबाईल मनोऱ्याच्या चोवीस बॅटरी व एक पॉवर मॉडेलची चोरी झाली. याप्रकरणी ‘बीएसएनएल’चे कर्मचारी नारायण सावळाराम दिघे (वय ४६, रा. नसरापूर, ता. भोर; मूळगाव सातेवाडी, ता. अकोले, जि. नगर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धांगवडीमधील बीएसएनएल कंपनीचा मोबाईल मनोऱ्याला चार्जिंगसाठी लागणाऱ्या २४ बॅटऱ्या व एक पॉवर मॉडेल, असे मिळून एकूण ५३ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी २८ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत झाली. या मोबाईल मनोऱ्याच्या सुरक्षेसाठी कोणत्याही कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. त्याचा गैरफायदा चोरट्यांनी उठवला असल्याचे दिसते. याबाबत किकवी पोलिस चौकीचे पोलिस नाईक गणेश लडकत हे पुढील तपास करत आहेत.