कांजळे गावची आर्थिक साक्षरेतुन समृध्देकडे वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांजळे गावची आर्थिक साक्षरेतुन समृध्देकडे वाटचाल
कांजळे गावची आर्थिक साक्षरेतुन समृध्देकडे वाटचाल

कांजळे गावची आर्थिक साक्षरेतुन समृध्देकडे वाटचाल

sakal_logo
By

नसरापूर, ता.९ : कांजळे (ता.भोर) येथील महिलांनी नाबार्ड व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जिद्दीने व कष्टाने आपल्या गावातील बचत गटातील महिलांचा व गावचा विकास साधत नाबार्डचा ''आर्थिक साक्षरतेतून समृध्दीकडे'' हा मंत्रजागर केला आहे. त्यामुळे कांजळे गावची आर्थिक समृध्दीच्या दिशेने वेगाने वाटचाल होत आहे, असे गौरवोद्गार नाबार्डचे जिल्हा अधिकारी रोहन मोरे यांनी काढले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिवरे शाखेच्या पुढाकाराने कांजळे येथे ग्रामस्थ महिलांसाठी आर्थिक व डिजीटल प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यास तालुक्यात महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात सुजित शेख यांनी नाबार्ड व पीडीसीसी बँकेच्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमाची देऊन बँक केवळ नाममात्र १०० रुपयांमध्ये प्रत्येकाचे बचत खाते उघडून घेऊन त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा रुपये दोन लाखाचे संरक्षण देत आहे. या योजनेत सर्वांनी सहभाग घेण्यासाठी बँक एक वर्षाचा हप्ता भरणार असल्याची त्यांनी माहीती दिली तसेच बचत गटांना व महिलांना करता येणाऱ्या व्यवसायाचे त्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, गावातील टोमॅटो प्रक्रिया उद्योगाची माहिती मोरे यांनी घेतली. कार्यक्रमात नवहन बचत खाते उघडलेल्या खातेदारांना पासबुकचे वितरण करण्यात आले

यावेळी जिल्हा बँकेचे विकास अधिकारी सुदाम पवार, अधिकारी सुजित शेख, बँकेचे शाखाव्यवस्थापक सागर गाडे, गावच्या सरपंच वैष्णवी निकम, ग्रामसेवक दीपक सुरवसे, सिकंदर हिंगे, बँकसखी चैत्राली पवार, रेखा काटे, बँकेच्या आर्थिक साक्षरता विभागाच्या समन्वयक योगिता बांदल, बचत गटाच्या अध्यक्षा अनुसया सुतार व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सिकंदर हिंगे यांनी आभार मानले.
02868