
कुरंगवडीत दोन पॅनेलमध्ये सरळ लढत
नसरापूर, ता. १३ : कुरुंगवडी (ता. भोर) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासह सात जागांसाठी श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनेल व श्री म्हातोबा जनविकास ग्रामसमृद्धी पॅनेल या दोन पॅनेलमध्ये लढत होत आहे.
कुरंगवडीचे सरपंचपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असून, या पदासाठी म्हातोबा ग्रामविकास पॅनेलकडून अंजली सुभाष ननावरे या लढत देत आहे. तर, विरोधी श्री म्हातोबा जनविकास ग्रामसमृद्धी पॅनेलकडून चैत्राली समीर राऊत या निवडणूक लढवत आहे.
ग्रामपंचायतीच्या इतर सात सदस्यांसाठी देखिल एकास एक लढत होत असून, श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनेलकडून वॉर्ड क्रमांक एकमधून ऋषिकांत नामदेव शिळीमकर, संगीता काळूराम घोरे, शशिकला विजयकुमार शिळीमकर हे तीन उमेदवार असून, वॉड क्र. दोनमधून मंदा दत्तात्रेय खंडाळकर, विश्वनाथ आबासाहेब कचरे हे दोन उमेदवार आहेत; तर वॉर्ड क्रमांक तीनमधून सचिन रोहीदास शिळीमकर व निलम संतोष सणस हे दोन उमेदवार लढत देत आहेत.
श्री म्हातोबा जनविकास ग्रामसमृद्धी पॅनेलकडून वॉर्ड क्रमांक एकमधून संदीप नारायण शिळीमकर, मीना विजय शिळीमकर, मिताली संदीप शिळीमकर हे तीन उमेदवार असून, वॉर्ड क्रमांक दोनमधून धनाजी किसन कचरे व कामिनी रवींद्र शिळीमकर हे दोन उमेदवार आहेत, तर वॉर्ड क्रमांक तीनमधून शेखर पंढरीनाथ शिळीमकर व ताराबाई नथू शिर्के हे दोन उमेदवार लढत देत आहेत.
दोन्ही पॅनेलने त्यांच्या समर्थकांसह रविवारी ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिरासमोर नारळ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला. निवडणुकीत कोणताही वाद न होता खिलाडूवृत्तीने सर्व ग्रामस्थांनी निवडणुकीस सामोरे जावे, असे आवाहन यावेळी ज्येष्ठांनी केले.