युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न फसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न फसला
युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न फसला

युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न फसला

sakal_logo
By

नसरापूर, ता. २८ : पुणे सातारा महामार्गावर सारोळा (ता. भोर) येथील आत्महत्येचा हॉटस्पॉट ठरलेल्या नीरानदीच्या पुलावरून आज (ता. २८) दुपारच्या सुमारास एका युवतीने पाण्यात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथे असलेले स्थानिक नागरिक, पोलिसांनी या युवतीला पाण्याच्या बाहेर काढल्याने तिचा आत्महत्येचा प्रयत्न असफल ठरला.
पुणे येथील निगडीत कामास असलेली २१ वर्षीय युवती तिच्या खटाव (तालुका, जिल्हा सातारा) येथील मुळ गावी जात असताना आज सारोळा (ता. भोर) येथे महामार्गावर उतरून दुपारी तिने पावणेचारच्या सुमारास पाण्यात उडी मारली. तेथे असलेल्या सौरभ धाडवे यांनी या बाबत पोलिसांना कळवले. दरम्यान नागरीकांनी उडी मारलेल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला. किकवी पोलिस चौकीचे कर्मचारी गणेश लडकत आणि त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. त्यांनी नदी लगतच्या रिसॉर्ट वरील बोटीच्या सहाय्याने युवतीला वाचवून पाण्यातून बाहेर काढले. तिला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्याकडून कुटुंबीयांची माहिती घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. उपचारानंतर युवतीला तिचे चुलते व भावाच्या ताब्यात दिले आहे.