कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या 
दोन जणांवर गुन्हा दाखल

कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल

नसरापूर, ता. २८ ः निर्दयपणे वाहनांमध्ये कोंबून जनावरांना कत्तलीसाठी नेत असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे- सातारा महामार्गावर पाठलाग करून जनावरे पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील जनावरे व वाहनासह ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अमोल विश्वनाथ पाईकराव (वय ३२) व रमेश बन्शी कांबळे (वय ५७ दोघेही रा. धावडे वस्ती, भोसरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुवारी (ता. २६) रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान वरील घटना घडली. ६० हजार रुपये किमतीच्या आठ ते नऊ वयाच्या सहा म्हशी तसेच तीन लाखाचा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
नसरापूर येथे वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन न थांबल्याने पाठलाग करून सामाजिक कार्यकर्त्यांनी किकवी गावच्या दरम्यान पुणे ते सातारा महामार्गावर आयशर टेम्पोमधून सहा म्हशी कत्तलखान्याकडे कत्तलीसाठी घेऊन जाताना पकडले. प्रशांत दत्तात्रेय साष्टे यांनी याबाबत फिर्याद दिली असून पुढील तपास राजगड पोलिस करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com