बनेश्वरला अखंड हरिनाम सप्ताह सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनेश्वरला अखंड हरिनाम सप्ताह सुरू
बनेश्वरला अखंड हरिनाम सप्ताह सुरू

बनेश्वरला अखंड हरिनाम सप्ताह सुरू

sakal_logo
By

नसरापूर, ता. १३ ः नसरापूर येथील बनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. या सप्ताहात नामवंत कीर्तनकारांची सेवा तसेच रोज सायंकाळी रामकथा व परिसरातील भजनी मंडळांचा जागर ठेवण्यात आला आहे.
रविवारपासून (ता. १२) या उत्सवास सुरुवात झाली. यावेळी नसरापूरच्या सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच संदीप कदम, वनअधिकारी एस. पी. जाधव, उद्योजक अनंतराव भिंताडे, योगेशशेठ अगरवाल, अशोकराव जाधव, संतसेवा संघाचे संजयजी गोडबोले, बनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम दातार, नरसिंग महाराज ढेकाणे, कृष्णा महाराज लिम्हण, नवनाथ महाराज लिम्हण, डॉ. श्याम दलाल, डॉ. गणेश हिवरेकर, संपतराव कोकाटे, बाळकृष्ण यादव, एकनाथ कोंडे, सुभाष पवार, बनेश्वर सेवा मंडळाचे व राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी रांजणे व सर्व सहकारी उपस्थित होते
सप्ताहात दररोज सायंकाळी पाच ते साडे सहापर्यंत तुकाराम महाराज शास्त्रीजी हे रामकथा सादर करत असून रोज सायंकाळी सात ते नऊपर्यंत किर्तनसेवा होणार आहे. यामध्ये मांडवीचे संतोष महाराज पायगुडे, नाशिकचे पंडित महाराज कोल्हे, पाथर्डीचे मुकुंदकाका जाटदेवळेकर, मुंबईचे रामेश्वर महाराज शास्त्री, बंडातात्या कराडकर, लातूरचे विठ्ठल महाराज दिवेगावकर, मानवत येथील उमेश महाराज दशरथे व शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी (ता. १९) रोजी काल्याचे कीर्तन तुकाराम महाराज शास्त्री यांचे होणार असून याच दिवशी गुणवंत वारकरी यांना वारकरी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. दररोज कीर्तनानंतर दानशूर व्यक्तींच्या वतीने महाप्रसादासाठी अन्नदान करण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे सचिव संपतराव तनपुरे यांनी दिली.