Sun, May 28, 2023

संजय राऊत यांच्याविरूद्ध
राजगड पोलिसांकडे तक्रार
संजय राऊत यांच्याविरूद्ध राजगड पोलिसांकडे तक्रार
Published on : 20 February 2023, 3:10 am
नसरापूर, ता. २० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भोर-वेल्हे तालुकाप्रमुख यांनीदेखील खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
शिंदे गटाचे बाळासाहेबांची शिवसेना भोर-वेल्हे तालुकाप्रमुख गणेश मसुरकर यांनी नसरापूर राजगड पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २०) तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, खासदार संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा भोर-वेल्हे शिवसेनेतर्फे आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा तक्रार अर्जात दिला आहे.