Thur, June 1, 2023

नसरापूरच्या मध्य वस्तीत
कडी कोयंडा तोडून चोरी
नसरापूरच्या मध्य वस्तीत कडी कोयंडा तोडून चोरी
Published on : 25 February 2023, 3:20 am
नसरापूर, ता. २५ : नसरापूर (ता. भोर) येथील मध्य वस्तीमध्ये घराचा कडी कोयंडा तोडून घरातील सोन्याच्या कानातील रिंग व चिल्लर नाण्यांचा डबा चोरट्यांनी चोरुन नेला.
याबाबत जमीर इब्राहिम मुलाणी (वय ४६, रा. मुलाणीआळी, नसरापूर) यांनी फिर्याद दिली. जमीर मुलाणी व त्यांचे कुटुंबीय शुक्रवारी (ता. २४) रात्री घराचे दरवाजे लावून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. चोरट्यांनी घराचा दरवाजा हत्याराने उचकटून घरात प्रवेश करून घरातील २५ हजार रुपयांचे सोन्याचे कानातील रिंग व एक हजार रुपये चिल्लर असलेला डबा, असे मिळून २६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सकाळी उठल्यावर दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यावर याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.