नसरापुरात मुली, महिलांसाठी क्रीडा स्पर्धा

नसरापुरात मुली, महिलांसाठी क्रीडा स्पर्धा

नसरापूर, ता. ७ ः जागतिक महिला दिनानिमित्त तनिष्का व्यासपीठ नसरापूर व बनेश्वर क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने नसरापूर येथे विद्यार्थिनी व महिलांसाठी तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा नसरापूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणावर (ता. १२) मार्च रोजी सकाळी साडेसात ते अकरा यावेळेत होणार आहेत. २०० व ४०० मिटर रनिंग, गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी या चार प्रकारात वयोगट १२ ते १४, १४ ते १७, १७ ते २१ व २१च्या पुढे खुल्या गटातील महिलांसाठी ४०० मिटर जलद चालण्याची स्पर्धा होणार आहे.
सर्व वयोगटातील सर्व खेळात प्रथम तीन क्रमांकाची निवड करण्यात येऊन विजेत्यांना स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी तनिष्का व्यासपीठ नसरापूर व बनेश्वर क्रीडा प्रबोधिनी वतीने आवाहन करण्यात आले असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९९६०१७९५९६ किंवा ९२२६२६८०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com