न्हावी सोसायटीत सरळ लढतीमुळे रंगत

न्हावी सोसायटीत सरळ लढतीमुळे रंगत

नसरापूर, ता. २२ : भोर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठ्या न्हावी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांची निवडणूक होत असून, सोसायटीत सत्तेवर असलेल्या श्री यमाईमाता शेतकरी विकास पॅनेल विरुद्ध शेतकरी सहकार परिवर्तन पॅनेलमध्ये १३ जागांसाठी सरळ लढत होत आहे. २५ मार्च रोजी मतदान व त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होत आहे.
न्हावी सर्व्हे क्र.३२२, न्हावी सर्व्हे क्र.१५, भांबवडे, पेंजळवाडी, अशा चार गावांची मिळून असलेल्या न्हावी सोसायटीचा कारभार मोठा असून, संस्थेचे साधारण १३०० सभासद आहेत. भागभांडवल एक कोटी ३० लाखाच्या आसपास आहे. जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप या सोसायटीचे सभासद आहेत. तेरा संचालकांच्या निवडीवर मागील पंचवार्षिक निवडणुकीत भालचंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली श्री यमाईमाता पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. या वर्षी देखिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यमाईमाता पॅनेल कपबशी चिन्हावर सर्वच्या सर्व तेरा जागा लढवत आहेत. पॅनेल प्रमुख म्हणून जगताप यांनी सांगितले की, मागील पंचवार्षिकमध्ये कोरोना कालावधी असतानाही संचालक मंडळाने अतिशय चांगले काम केले. सभासदांना दहा टक्के लाभांश दिला. संस्थेने जवळपास ९० टक्के वसुली केली असून, संस्था चांगल्या प्रकारे चालवली आहे. या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने यमाई माता पॅनेलचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी होतील.
या पॅनेलच्या विरोधात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे व राजगड कारखान्याचे संचालक के. डी. सोनवणे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार परिवर्तन पॅनेल बॅट चिन्हावर सर्व तेरा जागा लढवत आहे. पॅनल प्रमुख शैलेश सोनवणे यांनी शेतकरी पॅनेलच्या विजयाची खात्री देताना सांगितले की, आमचे सर्व उमेदवार सहकाराशी संबोधित असून, सर्व गावांना योग्य प्रतिनिधित्व दिले आहे. मागील वेळेस निसटत्या फरकाने पराभव झाला होता. यावेळी मात्र आम्ही सर्वजण एकत्र असून, शेतकरी सहकार परिवर्तन पॅनेलचा मोठा विजय होईल.
चुरशीच्या चाललेल्या या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com