पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही संपविले जीवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही संपविले जीवन
पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही संपविले जीवन

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही संपविले जीवन

sakal_logo
By

नसरापूर, ता. ३० : माहेरी गेलेल्या पत्नीने मावशीच्या घरी जाऊन, गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या अंत्यविधीनंतर दुसऱ्याच दिवशी नैराश्य आलेल्या पतीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या या नवदांपत्याच्या आत्महत्येने केळवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
केळवडे (ता.भोर) येथील नवविवाहिता समृद्धी धीरज कोंडे (वय २२) ही माहेरी गेली असताना पिरंगुट (ता. मुळशी) येथे जाऊन मंगळवारी (ता. २८ मार्च) तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा अंत्यविधी ता. २९ रोजी केळवडे येथे पार पडला. त्यानंतर तिचा पती धीरज प्रचंड नैराश्यात आला. यामुळे त्याने गुरुवारी (ता.३०) दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्यास तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.


03225