बनेश्‍वर उद्यानास संरक्षक भिंतीची गरज

बनेश्‍वर उद्यानास संरक्षक भिंतीची गरज

किरण भदे : सकाळ वृत्तसेवा
नसरापूर, ता. २४ : येथील (ता. भोर) निसर्गरम्य बनेश्वर वनउद्यानास शिवगंगा नदी किनाऱ्याच्या बाजूसह इतर बाजूने संरक्षक भिंतीची गरज आहे. शेकडो वर्ष झालेल्या येथील वृक्षांबरोबर वनउद्यान सातत्याने बहरत राहण्यासाठी नव्याने वृक्षारोपण होणे गरजेचे आहे, अशी मागणी वनप्रेमींकडून होत आहे. मुख्य प्रवेशव्दारापासून महादेव मंदिरापर्यंतचा रस्ता चांगला होणे आवश्यक आहे व उद्यानातील स्वच्छतेमध्ये सातत्य राहिल्यास नैसर्गिक उद्यानाच्या सौंदर्यात भर पडले, असे मत येथे भेट देणाऱ्या पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.

वन उद्यानात पुढील अनेक वर्ष टिकून राहण्यासाठी एवढ्या मोठ्या वयाचे झालेल्या वृक्षांचे अस्तित्व संपण्याआधीच नव्याने विविध प्रकारच्या वनौषधी किंवा जास्त वर्ष टिकणाऱ्या वृक्षांचे रोपण होणे गरजेचे आहे. या बरोबरच नक्षत्र उद्यानाच्या माध्यमातून वेगवेगळे वृक्ष लावणे, मुख्य म्हणजे उद्यानाच्या संरक्षणासाठी शेजारुन वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावर उद्यानाला लागून संरक्षक भिंत होणे गरजेचे आहे.

वनविभाग व वनसंरक्षण समिती नसरापूर यांच्या प्रयत्नाने येथील नैसर्गिक सौंदर्य टिकले आहे. पर्यटकांच्या प्रवेशशुल्काच्या मदतीने या वनविभागात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. बनेश्वर मंदिराच्या परिसरातील साधारण साडे आठ हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या नैसर्गिक उद्यानात सुमारे ७०, ८० ते १०० वर्ष वयाचे वृक्ष आहेत. येथील एक अर्जुन वृक्ष सुमारे १२० ते १३० वर्ष वयाचा आहे. इतरही वृक्ष दुर्मिळ व वनौषधीचे आहेत.

दरम्यान, उद्यानात पर्यटकांनी केलेला कचरा उचलण्यासाठी रोजंदारीवर सुमारे १४ कामगारांची नेमणूक केली आहे. मात्र, तरी देखील पूर्ण स्वच्छता होत नाही. मुख्य कमानीपासून आत आल्यावर लगेचच डाव्या हाताला नव्याने केलेल्या वाहनतळाजवळ कायम कचरा पडलेला असतो. तेथे स्वच्छता होणे गरजेचे आहे

पर्यटक, वन्यप्रेमींसाठी असणाऱ्या सुविधा
* नदीचे व धबधब्याचे विहंगम दृष्य पाहण्यासाठीची मनोरे
* पर्यटकांना धाडसी खेळासाठी ॲडव्हेंचर पार्क
* निसर्ग निर्वाचन केंद्र, बांबू हाऊस, रोपवाटिका
* पहाटे फिरावयास येणाऱ्यांसाठी खुली व्यायामशाळा
* मुलांसाठी बालोद्यान, नाना नानी पार्क, बॅडमिंटन कोर्ट
* झाडांच्या पानांच्या कचऱ्यापासून गांडूळखत प्रकल्प

अशी आहे दुरवस्था
* बालोद्यानातील तुटलेली खेळणी,
* ओपन जिम मधील तुटलेल साहित्य,
* बसण्यासाठी ठेवलेले सिमेंटचे बाकडे तुटली
* शोभिवंत रोप वाटिकेची दुरवस्था

या घटकांची आवश्यकता
* स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र कामगार नेमणुकीची गरज
* मुख्य कमानीपासूनचा रस्ता नव्याने होणे आवश्यक
* वाहनांची गर्दीसाठी वाहनतळाची जागा आवश्‍यक
* मोठ्या बस येण्यासाठी मुख्य कमानीची उंची वाढवणे गरजेची

बनेश्वर वनउद्यानात लवकरच बटरफ्लाय गार्डन करण्याचा प्रयत्न आहे. वनसमितीच्या माध्यमातून येथील झाडांच्या पालापाचोळ्यापासून कंपोष्टखत निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यामाध्यमातून उत्पन्न वाढून उद्यानाच्या देखभालीसाठी चालना अधिक मिळणार आहे.
- नितीन खताळ, वनपाल

03269

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com