सारोळा येथे साडेपाच किलो गांजा जप्त

सारोळा येथे साडेपाच किलो गांजा जप्त

नसरापूर, ता. २३ : मुंबईहून कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या तुषार नरेंद्र जोशी (वय २७, रा.फलनीस रोड, मंगळूर कर्नाटक) याच्याकडे सुमारे ५६ हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. त्यास राजगड पोलिसांनी सारोळा (ता. भोर) येथील हॉटेलच्या पार्किंगमधून अटक केली व त्याच्याकडून गांजा जप्त केला.
हॉटेलच्या पार्किंगमध्ये तुषार त्याच्याकडील राखाडी रंगाच्या बॅगमध्ये गांजा बाळगून असल्याचे समजल्यावर राजगड पोलिस ठाण्याच्या किकवी चौकीच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर तरुण जोशी यास ताब्यात घेतले असता त्याच्या बॅगमध्ये पाच किलो सहाशे दहा ग्रॅम गांजा आढळून आला. याबाबत किकवी पोलिस चौकीचे हवालदार योगेश राजीव यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com