Thur, October 5, 2023

सारोळा येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
सारोळा येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
Published on : 23 April 2023, 3:40 am
नसरापूर, ता.२३ : पुणे-सातारा महामार्गावर साताऱ्याकडे जाणाऱ्या मोटारीसमोर अचानक दुचाकी आली. यामुळे सारोळा (ता.भोर) येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या सतीश विठ्ठल निगडे (वय ४३, रा. किकवी ता.भोर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२२) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सातारा-पुणे लेनवर बाबासाहेब तानाजी चव्हाण (वय ३९, रा.सातारा) हे त्यांची मोटार घेऊन साताऱ्याकडे जात होते. त्यावेळी सारोळा येथे गावच्या हद्दीत सतीश दुचाकीवरून रस्ता दुभाजकामधून अचानक रस्त्यावर आले. यामुळे मोटार व दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीस्वार सतीश गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत मोटारचालक बाबासाहेब तानाजी चव्हाण यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास किकवी पोलिस चौकीचे हवालदार चव्हाण करत आहेत.
NAS23B03277