अपघातात अनोळखी व्यक्ती ठार

अपघातात अनोळखी व्यक्ती ठार

नसरापूर, ता. ७ : पुणे सातारा महामार्गावर निगडे (ता. भोर) गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर रात्रीच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने ठोकरल्याने रस्त्यावर फिरणारा अनोळखी इसम गंभीर जखमी होऊन ठार झाला.
या बाबत महामार्गावरील रुग्णवाहिकेचे चालक सूरज देवकर (वय ३४, रा. शिवरे) यांनी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन व वाहनचालकाच्या विरोधात तक्रार दिली आहे. शुक्रवारी (ता. ५) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावर निगडे गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर पुण्याच्या दिशेने साताऱ्याकडे जाणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने रस्त्यावर चालणाऱ्या अनोळखी इसमास जोरदार ठोकर मारुन गंभीर जखमी झाल्याने सदर व्यक्ती उपचारापूर्वीच ठार झाला. राजगड पोलिसांनी या बाबत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अपघातातील मृत अनोळखी इसमाची ओळख पटण्यासारखी कोणतीही खूण किंवा वस्तु त्यांच्याकडे मिळाली नाही. मृतदेहाची सर्व नोंद घेऊन बेवारस म्हणून भोर नगरपालिकेच्या वतीने मृतावर अंत्यसंस्कार केल्याची माहिती तपास अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com