बनेश्‍वरला पीएमपीएलच्या पर्यटन सेवेचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनेश्‍वरला पीएमपीएलच्या पर्यटन सेवेचे स्वागत
बनेश्‍वरला पीएमपीएलच्या पर्यटन सेवेचे स्वागत

बनेश्‍वरला पीएमपीएलच्या पर्यटन सेवेचे स्वागत

sakal_logo
By

नसरापूर, ता. १६ ः पीएमपीएलच्या वतीने पुणे शहरापासून लगतच्या प्रसिद्ध मंदिर व पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी पर्यटन सेवेच्या वातानुकूलित बसचा प्रारंभ झाला असून नसरापूर बनेश्वर मंदिर येथे आलेल्या पहिल्या बसचे बनेश्वर देवस्थान ट्रस्ट व नसरापूर ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच पीएमपीएल अधिकाऱ्यांचा व चालक, वाहकाचा सत्कार करण्यात आला.
पीएमपीएलच्या या पर्यटन सेवेच्या हडपसर येथून सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर दत्तमंदिर, बालाजी मंदिर केतकावळे, बनेश्वर मंदिर नसरापूर, कोंढणपूर तुकाईमाता मंदिर व पुन्हा हडपसर अशा पहिल्या मार्गाची वातानुकूलित सेवा रविवारपासून (ता. १४) सुरू झाली. यास पर्यटकांनी देखिल चांगला प्रतिसाद दिला. यावेळी या पहिल्या फेरीची बस बनेश्वर मंदिर येथे आली असता श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने तसेच नसरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव अनिल गयावळ, विश्वस्त आबासाहेब यादव, ज्योती चव्हाण, नसरापूरच्या सरपंच सपना झोरे, सदस्या अश्विनी कांबळे, रामराजे कदम, प्रसन्न गयावळ आदी उपस्थित होते
या बस समवेत आलेले पीएमपीएलचे अधिकारी दत्तात्रेय बडदे, नियंत्रक उल्हास पानसरे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिजित जाधव, चालक प्रकाश राऊत, वाहक सूर्यकांत वाघबीजे तसेच पीएमपीचे प्रसिध्दी प्रतिनिधी व पर्यटक प्रतिनिधी यांचा सत्कार देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व सरपंच सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.

ssociated Media Ids : NAS23B03309