आदिवासींना समान संधी मिळायला हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासींना समान संधी मिळायला हवी
आदिवासींना समान संधी मिळायला हवी

आदिवासींना समान संधी मिळायला हवी

sakal_logo
By

नसरापूर ता.१८ : ''''आपण सर्व भारतीय आहोत. कोणीही उपरे नाही. आदिवासींना उपरे म्हणू नका. हा सर्वात मोठा गुन्हा आहे. आदिवासींना समान संधी व न्याय मिळालाच पाहिजे. यासाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर स्वातंत्र्याचा अर्थ काय'''' असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बहुजन कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी आदिवासी मेळाव्यात बोलताना काढले.


नसरापूर (ता. भोर) येथे सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने आदिवासी कातकरी हक्क अधिकार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. भारत पाटणकर, ॲड. मोहन वाडेकर, आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे, आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीधर पवार, यशदाचे निवृत्त अधिकारी रवींद्र चव्हाण, गणपत काटकर, अंकल सोनवणे, सुदाम भोये, नागेश गायकवाड, ॲड. शारदा वाडेकर, नीरा वाघमारे, शिवसेनेचे कुलदीप कोंडे, काँग्रेसचे महेश टापरे, दत्तात्रेय मालुसरे, यांच्यासह बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी भोर, वेल्हे, मुळशी व हवेली तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

देशाचा सन्मानीय नागरिक म्हणून सर्वांना जगता आले पाहिजे. सध्या आज उलटे चालले आहे. घटनेच्या ऐवजी देश जुन्या पद्धतीने चालवायचा चालले आहेत. जात पात काढली जात आहे. हे चालणार नाही. आदिवासी कातकरी म्हणून न डावलता विकासाची संधी दिलीच पाहिजे. आयोजकांनी चांगला प्रश्न उपस्थित करून मेळावा घेतला. कुठेही लढा द्यायचा असेल तर मी माझे वय ९३ झाले आहे तरी तुमच्या बरोबर राहील.
- डॉ बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

अधिकारी आमदारांची अनुपस्थिती
आदिवासी मेळाव्याच्या आयोजकांनी भोरचे आमदारांसह, जिल्हाधिकारी, तहसीलदार,पोलिस निरीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले होते. मात्र कोणीही उपस्थित राहीले नाही याबद्दल आदिवासींना कायम दुर्लक्षित केले जात असल्याचे सांगत आयोजकांनी नाराजी व्यक्त करत केली.

03313