केंजळ येथे घरातून ६७ हजारांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंजळ येथे घरातून ६७ हजारांचा ऐवज लंपास
केंजळ येथे घरातून ६७ हजारांचा ऐवज लंपास

केंजळ येथे घरातून ६७ हजारांचा ऐवज लंपास

sakal_logo
By

नसरापूर, ता.२५ केंजळ (ता.भोर) येथील बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (ता.२३) पहाटे घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व टिव्ही संच असा एकूण ६७ हजारांचा ऐवज चारून नेला. याबाबत किकवी पोलिस चौकीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शांताराम गेणबा भालघरे (वय ६६) यांनी फिर्याद दिली. कपाटातील १५ हजार रुपयांचे पाच ग्रँम वजनाचे मंगळसूत्र, १५ हजार रुपयांचे पाच ग्रँम वजनाचे नेकलेस, ६ हजार रुपये किमतीचे चांदीचे तोडे, २६ हजार रुपये रोख व पाच हजार रुपये किमतीचा टीव्ही संच चोरून नेला.
दरम्यान, चोरीच्या दुसऱ्या घटनेत कापूरहोळ (ता.भोर) येथे महामार्गावर चालत जाणाऱ्या तरुणाच्या हातातील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेत, दुचाकीवरील तिघांनी पळ काढला. याबाबत सागर विजय दिघे वय (३९ रा. बजरंग आळी भोर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी (ता.२२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत किकवी पोलिस चौकीत तक्रार दाखल झाली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ करत आहेत.