भोरमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

भोरमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

नसरापूर, ता. २९ ः भोर तालुक्यातील जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच विविध दाखले काढण्यासाठी (ता. ३०) मे रोजी शासन आपल्या दारी हा उपक्रम महसुल विभागाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. नसरापूर येथे व भोर शहरात एकाच दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
सर्व नागरिकांना शासनाचे विविध दाखले एकाच वेळी मिळावेत तसेच आधार नोंदणी, नविन मतदार नोंदणी, दिव्यांगांसाठी कार्ड नोंदणी, शिधापत्रिका नाव लावणे, काढणे, दुरुस्ती महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती व अर्ज दाखल करून घेणे या बरोबरच कृषी विभागाच्या योजना, नविन वीज जोडसाठी अर्ज, आरोग्य विभागाच्या योजना, टपाल खात्याच्या योजना, राज्य परिवहन विभागाच्या योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजना, पाटबंधारे विभाग व भूमी अभिलेख विभागाच्या योजना व सेवा यांचा लाभ या शासन आपल्या दारी उपक्रमात होणार आहे.
भोर शहरात गंगोत्री हॉल येथे भोर, भोलावडे, संगमनेर, आंबवडे, निगुडघर महसुल मंडलातील गावांसाठी तर नसरापूर येथील कुंभारकर लॉन्स मंगल कार्यालयात वेळू, नसरापूर, किकवी मंडलातील गावांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार असून सर्व विभागाचे अधिकारी यासाठी उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसुल विभागाच्या वतीने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com