Sat, December 2, 2023

किकवी येथे वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
किकवी येथे वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Published on : 22 September 2023, 12:27 pm
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर किकवी (ता.भोर) गावच्या हद्दीत सोमवारी (ता.१८ ) मध्यरात्री अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघात दत्तात्रेय नारायण निगडे (रा.केदारेश्वर मंदिर शिरवळ ता.खंडाळा) यांचा मृत्यू झाला. त्यांचा पुतण्या विश्वास प्रकाश निगडे यांनी याबाबत राजगड पोलिस ठाण्यात निगडे हे शिरवळकडे जात असताना महामार्गावर किकवी येथील अंकुर हॉस्पिटलजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार ठोकर मारली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक गणेश लडकत पुढील तपास करत आहेत.