नागरगावच्या शेलार यांचे ‘एमपीएससी’त यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरगावच्या शेलार यांचे ‘एमपीएससी’त यश
नागरगावच्या शेलार यांचे ‘एमपीएससी’त यश

नागरगावच्या शेलार यांचे ‘एमपीएससी’त यश

sakal_logo
By

न्हावरे, ता. ३ : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत चा निकाल नुकताच लागला असून, या परीक्षेत नागरगाव (ता. शिरूर) येथील एका सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याचा मुलगा सागर हरिभाऊ शेलार यांनी राज्यात १७ वा क्रमांक मिळवला आहे. त्याने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळविले. सागर यांचे वडील नागरगाव येथील चैतन्य कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत कर्मचारी आहेत तर त्याची आई गृहिणी आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण गावानजीकच्या शेलार मळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण गावातील सद्‍गुरू कृपा विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण मुक्तांगण इंग्लिश स्कूल, सहकारनगर येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण जेएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा संकल्प केला होता.

ते २०१७ पासून पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करीत होते. पहिल्या वेळी ते पूर्व परीक्षेत नापास झाले तर दुसऱ्यावेळी मुख्य परीक्षेत थोडक्यात त्यांची संधी हुकली होती. मात्र तिसऱ्यावेळी त्यांनी यशाला गवसणी घालत राज्यात १७ वा क्रमांक पटकावला. एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपल्या मित्रांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे सागर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्याचा पाठलाग करावा त्यासाठी जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा म्हणजे यश निश्चित मिळते. या प्रवासात कुटुंबीय खंबीरपणे मागे उभे राहिल्याचे सागर यांचे वडील हरिभाऊ शेलार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Nha22b00684 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top