न्हावरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्हावरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार
न्हावरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

न्हावरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

sakal_logo
By

न्हावरे, ता. २१ ः न्हावरे (ता. शिरूर) परिसरातील बिडगरवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार झाल्याने घबराट पसरली आहे. त्यामुळे वनखात्याने बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी माजी उपसरपंच दादासाहेब बिडगर व किसनराव बिडगर यांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात आनंदा सुखदेव बिडगर यांचा बोकड ठार झाला आहे. घराशेजारील गोठ्यातील जनावरांच्या आवाजाने बिडगर यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्या जनावरावर हल्ला करत होता. दरम्यान त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने सावज सोडून अंधारात घराशेजारीच असलेल्या उसात धूम ठोकली. या हल्ल्यात बोकड ठार झाला होता. या घटनेचा पंचनामा वनकर्मचारी विशाल चव्हाण यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Nha22b00696 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..