न्हावरे शाळेत हरिनामाचा गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्हावरे शाळेत हरिनामाचा गजर
न्हावरे शाळेत हरिनामाचा गजर

न्हावरे शाळेत हरिनामाचा गजर

sakal_logo
By

न्हावरे, ता.२ : येथील (ता.शिरूर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी हरी नामाच्या गजरात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फडफड करणाऱ्या भगव्या पताका, हरिनामाचा गजर व टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात सर्वत्र भक्तिभावाने वातावरण निर्माण झाले आहे. न्हावरे शाळेत ही विद्यार्थ्यांसाठी आपला सांस्कृतिक ठेवा भक्तीची जोपासना व्हावी या हेतूने न्हावरे गावातून विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती मुख्याध्यापक भरत घायतडक यांनी दिली. न्हावरे बाजारपेठेत या दिंडी सोहळ्याचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत करून दिंडी सोहळ्यात सहभागी बाल वारकऱ्यांचे कौतुक केले.
01394

Web Title: Todays Latest District Marathi News Nha22b00716 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..