संतराज महाराज दिंडीची पंढरपूर येथे नगरप्रदक्षिणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संतराज महाराज दिंडीची पंढरपूर येथे नगरप्रदक्षिणा
संतराज महाराज दिंडीची पंढरपूर येथे नगरप्रदक्षिणा

संतराज महाराज दिंडीची पंढरपूर येथे नगरप्रदक्षिणा

sakal_logo
By

न्हावरे, ता. ११ : आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त संतराज महाराज पायी दिंडी सोहळ्याची पंढरपूर येथे नगरप्रदक्षिणा हरिनामाच्या गजरात, टाळ मृदंगाच्या तालावर हजारो भाविकांसमवेत भक्तिमय वातावरणात पार पडली.
शिरूर, दौंड तालुक्यातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र संगम वाळकी रांजणगाव सांडस बेट येथील संतराज महाराज पायी दिंडी सोहळा आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त शनिवार (ता. ९) पंढरपूर नगरीत आगमन झाले होते. आज एकादशीनिमित्त पादुकांचे पूजन श्री संतराज महाराज देवस्थानचे अध्यक्ष कीर्तनकार सुरेशमहाराज साठे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मुख्य नगरप्रदक्षिणा सोहळ्यास सुरुवात झाली. भक्त पुंडलिक महाराजांचे दर्शन घेऊन थेट विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करून या दिंडीचे आगमन संतराज महाराज धर्मशाळेत झाले. वाटेत ठिकठिकाणी भक्तजनांनी या दिंडीचे हरिनामाच्या गजरात स्वागत केले. यावेळी उपस्थित भक्तजनांना फराळाचेही वाटप करण्यात आले.
या दिंडी सोहळ्यात पुणे जिल्हा तसेच नगर जिल्ह्यातील भाविक जन सहभागी होत असतात.

01404

Web Title: Todays Latest District Marathi News Nha22b00720 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top