न्हावरे परिसरात पावसमुळे चाऱ्यांमधून पाणी खळाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्हावरे परिसरात पावसमुळे
चाऱ्यांमधून पाणी खळाळले
न्हावरे परिसरात पावसमुळे चाऱ्यांमधून पाणी खळाळले

न्हावरे परिसरात पावसमुळे चाऱ्यांमधून पाणी खळाळले

sakal_logo
By

न्हावरे, ता. २१ : शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसरात मागील काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने परिसरामधील शेतांतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले चासकमानच्या कालवे ठिकठिकाणी आपोआप वाहू लागल्याचे पाहायला मिळत आहे.

पावसामुळे परिसरातील ओढे, नाले, बंधारे तुडुंब भरले आहेत. सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन, कांद्याची रोपे, काढणीला आलेला भुईमूग, बाजरी, पालेभाज्या आदी सडून चालले आहे. तर उसाचे पीकही मागील महिनाभरापासून पाण्यात उभे आहे. नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस थांबत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाने सरसकट पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. येथील जमिनीपासून चासकमानच्या चाऱ्या आठ ते दहा फूट खोल असून, सध्या जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता संपली असल्याने थोडा जरी पाऊस झाला, तरी रस्त्यावर पाणी वाहत आहे. अद्यापही पाऊस उघडिपीचे नाव घेत नसल्याने परिसरातील शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.

न्हावरे (ता. शिरूर) : सततच्या पावसामुळे चासकमानच्या चाऱ्या आपोआप पाण्याने वाहू लागल्या आहेत. (दुसऱ्या छायाचित्रात) काढणीला आलेले सोयाबीनचे पीक दाखवताना शेतकरी.