लोकसेवा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुदाम भोंडवे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसेवा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुदाम भोंडवे बिनविरोध
लोकसेवा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुदाम भोंडवे बिनविरोध

लोकसेवा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुदाम भोंडवे बिनविरोध

sakal_logo
By

न्हावरे ता. २३ : न्हावरे (ता. शिरूर) येथील लोकसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुदाम भोंडवे यांची, तर उपाध्यक्षपदी प्रगती नवले यांची शुक्रवारी (ता. २३) बिनविरोध निवड करण्यात आली. दुसऱ्या संचालकांना पदाची संधी मिळावी, म्हणून जयसिंग गारगोटे व सहादु करपे यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये इतर कोणाचेही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे निवडणूक अधिकारी आप्पासाहेब धायगुडे व सचिव उत्तम कदम यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी अनुक्रमे भोंडवे व नवले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी गोपाळ हिंगे, जयसिंग गारगोटे, शंकरराव बहिरट, सहादु करपे, अब्दुल शेख, कैलास कोरेकर, तुळशीराम बिडगर, जितेंद्र कोरेकर, नलीनी काळे, सुरेखा कदम आदी उपस्थित होते.