न्हावरे येथे मेंढपाळांच्या ऐवजाची चोरी

न्हावरे येथे मेंढपाळांच्या ऐवजाची चोरी

न्हावरे, ता. २० : शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसरातील खंडागळेवस्ती येथे चोरट्यांनी मेंढपाळाच्या बिऱ्हाडावर दरोडा टाकून दोन तोळे सोने, एक लाख रुपये रोख रक्कम, असा एकूण एक लाख ऐंशी हजार रूपयांचा ऐवज पळविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळु मारुती कोकरे (रा. तांबेवस्ती, न्हावरे) यांचा मेंढ्यांचा कळप न्हावरे येथील शेतकरी नामदेव खंडागळे यांच्या शेतात गेल्या तीन दिवसांपासून मुक्कामी आहे. रविवारी रात्री (ता. १९) अकरा वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर बाळु कोकरे, त्यांच्या पत्नी भीमाबाई, वडील मारूती, आई शेवबाई हे मेंढ्यांच्या कळपाभोवती झोपले असताना मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी मेंढ्यांच्या कळपालगत असलेले बिऱ्हाड उचकटून त्यातील कठळ (पोते) सहाशे मीटर अंतरावर नेऊन जमीनीवर ओतले. त्यात असलेल्या सोन्याच्या दोन पोत, कानातील कुडक्या, मंगळसूत्र, एक लाख रूपयांची रोकड व इतर महत्त्वाच्या चीज वस्तू चोरट्यांनी लंपास करुन त्यांनी तिथून पलायन केले.
दरम्यान, सकाळी सहा वाजता भीमाबाई कोयांना जाग आल्यानंतर त्या बिऱ्हाडाजवळ गेल्या असता तेथील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी पती बाळु यांना याबाबत सांगितले. त्यानंतर बाळु यांना शोधाशोध करताना मेंढ्यांच्या कळपासून ६०० मीटर अंतरावर काही वस्तू फेकून दिल्याल्याचे दिसून आले व त्यातील मौल्यवान वस्तू दागिने व रोकड रक्कम घेऊन चोरटे पसार झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

उसणे आणलेली पैसे पळविले
या घटनेची फिर्याद बाळु कोकरे यांनी न्हावरे पोलीस दूरक्षेत्र केंद्रात दिली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ चव्हाण करत आहे. मेंढपाळ बाळु कोकरे यांनी विविध विकास सोसायटीचे कर्ज परत फेडीसाठी एक लाख रुपये पाहुण्यांकडून उसने आणले होते. दरम्यान चोरट्यांनी ही रक्कम चोरून नेल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com