Wed, October 4, 2023

प्रहार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय तरटे
प्रहार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय तरटे
Published on : 13 May 2023, 11:03 am
न्हावरे, ता. १३ : गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील प्रहार अपंग क्रांती बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय महादेव तरटे यांची, तर उपाध्यक्षपदी वैभव पंढरीनाथ झांजे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वराळ यांनी जाहीर केले.
संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकित अध्यक्षपदी तरटे तर, उपाध्यक्षपदी झांजे यांची सर्वानुमते निवड झाली. संचालक म्हणून दत्तात्रेय गणपत जगताप, शरद भरत वाबळे, अनिल जयसिंग शिंदे, संभाजी रामदास क्षीरसागर, सुनीता अनिल काळे, स्वाती महेंद्र निंबाळकर, तुषार वीरकुमार हिरवे, नागनाथ सुभाष रेडके, मनेष महादेव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली होती.