वळतीकरांचे प्रवेशद्वाराचे स्वप्न अखेर पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वळतीकरांचे प्रवेशद्वाराचे स्वप्न अखेर पूर्ण
वळतीकरांचे प्रवेशद्वाराचे स्वप्न अखेर पूर्ण

वळतीकरांचे प्रवेशद्वाराचे स्वप्न अखेर पूर्ण

sakal_logo
By

निरगुडसर, ता.३० : वळती (ता.आंबेगाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून जमा केलेल्या ४५ लाख रुपयांच्या देणगीतून सुसज्ज प्रवेशद्वाराची उभारणी केली आहे. या प्रवेशद्वारामुळे अनेक वर्षांपासून वळतीकरांचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते धोंडिभाऊ भोर आणि भाऊसाहेब भापकर यांनी पुढाकार घेतला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्या रविवारी (१ मे) प्रवेशद्वाराचे लोकार्पण होणार आहे.
प्रवेशद्वार नसल्याने गावाच्या वैभवात कुठे तरी कमीपणा जाणवत होता आणि गावाला प्रवेशद्वार हवे. असे स्वप्न अनेक वर्षांपासून ग्रामस्थ उराशी बाळगून होते. परंतु ते पूर्ण काही होईना. परंतु गावातील तरुण भोर आणि भापकर यांनी ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आणि कामाला सुरुवात झाली. जसे जसे प्रवेशद्वाराच्या कामाला सुरुवात झाली. तसे ग्रामस्थांकडूनही देणग्यांचा ओघ वाढू लागला. यासाठी कुठल्याही निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकजुटीतून देणगी रूपी सहकार्य केले. यातून तब्बल ४५ लाख रुपये खर्चून उभारलेले प्रवेशद्वार उभे केले. यामुळे वळती गावाच्या वैभवात आणखी भर पडली. अन्‌ ग्रामस्थांचे अनेक वर्षांचे स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरले आहे. सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारक उभे केले आहे. संपूर्ण प्रवेशद्वाराला विद्युत रोषणाई केली आहे. प्रवेशद्वाराला करण्यात आलेली विद्युत रोषणाई एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यामुळे पंचक्रोशीतून वळती ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

प्रवेशद्वाराच्या लोकार्पणप्रसंगी माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच या वेळी विविध मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. सकाळी भव्य मिरवणूक आणि रात्री जय मल्हार संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते धोंडिभाऊ भोर आणि सरपंच आनंद वाव्हळ यांनी दिली.

00170

Web Title: Todays Latest District Marathi News Nid22a00077 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top