वळतीच्या ग्रामस्थांचे काम आदर्शवत : वळसे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वळतीच्या ग्रामस्थांचे काम
आदर्शवत : वळसे पाटील
वळतीच्या ग्रामस्थांचे काम आदर्शवत : वळसे पाटील

वळतीच्या ग्रामस्थांचे काम आदर्शवत : वळसे पाटील

sakal_logo
By

निरगुडसर, ता. ३० : ‘‘वळती (ता. आंबेगाव) ग्रामस्थांनी देणगीतून उभारलेले शिवस्मारक आणि भव्यदिव्य प्रवेशद्वार हे नक्कीच आदर्शवत असून, इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे. वळती गावामध्ये विकास कामांचा ओघ हा भविष्यात देखील असाच चालू राहील. गावच्या सर्वांगीण विकासासाठी अजूनही नवीन विकासकामे लवकरच मार्गी लावू,’’ अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
वळती येथील ४५ लाख रुपये खर्च करून लोकसहभागातून ग्रामस्थांनी उभारलेल्या शिवस्मारक व प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आणि विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, बाळासाहेब बेंडे, देवदत्त निकम, अरुण गिरे, विवेक वळसे पाटील, राजाराम बाणखेले, विष्णूकाका हिंगे, सुरेश भोर, बाबासाहेब खालकर, तुलसी भोर, शिवाजीराव लोंढे, तहसीलदार रमा जोशी, धोंडिभाऊ भोर, भाऊसाहेब भापकर आदी उपस्थित होते.
सकाळी भव्य मिरवणूक आणि रात्री जय मल्हार संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला. भाऊसाहेब भापकर यांनी प्रास्ताविक; तर नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब बोऱ्हाडे यांनी आभार मानले.

PNE22S61998

Web Title: Todays Latest District Marathi News Nid22a00078 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top