रुग्णवाहिकेच्या धडकेत विवाहित महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णवाहिकेच्या धडकेत विवाहित महिलेचा मृत्यू
रुग्णवाहिकेच्या धडकेत विवाहित महिलेचा मृत्यू

रुग्णवाहिकेच्या धडकेत विवाहित महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

निरगुडसर, ता.१० : आई व बहिणीला भेटून घरी येत असताना रुग्णवाहिकेने दिलेल्या जोरदार धडकेत २७ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना शनिवारी (ता.९) रात्री ८ ते ८:३० च्या दरम्यान पुणे नाशिक हायवे रोडवर घडली आहे. या अपघातात काजल किशोर टाव्हरे (वय २७, रा.निरगुडसर , ता.आंबेगाव पुणे) हिचा मृत्यू झाला आहे. या बाबत शिवाजी राजू शिंदे (वय ३९, रा.वारूळवाडी, ता.जुन्नर) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तर अपघातास कारणीभूत ठरलेला रुग्णवाहिका चालक रमेश सुखदेव पानसरे (रा. वैद्य वाडा, बुधवार पेठ, जुन्नर ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काजल टाव्हरे या शनिवारी दुचाकी स्कुटीवरून (वारूळवाडी, ता.जुन्नर) येथे बहिणीला भेटायला गेली होती. बहिणीला भेटून त्या निरगुडसर येथे घरी निघाल्या असताना पुणे-नाशिक हायवे रोडवर हॉटेल नीलायमसमोर काजल टाव्हरे यांच्या स्कुटीला नारायणगाव बाजूकडून मंचर बाजूकडे जात असणाऱ्या रुग्णवाहिकेची जोरदार धडक दिली. या धडकेत काजल टाव्हरे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
00181

Web Title: Todays Latest District Marathi News Nid22a00081 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top