आंबेगाव, शिरूरमध्ये ‘आरोग्य’च्या पदांना मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव, शिरूरमध्ये ‘आरोग्य’च्या पदांना मंजुरी
आंबेगाव, शिरूरमध्ये ‘आरोग्य’च्या पदांना मंजुरी

आंबेगाव, शिरूरमध्ये ‘आरोग्य’च्या पदांना मंजुरी

sakal_logo
By

निरगुडसर, ता. २४ : आंबेगाव व शिरूर तालुक्यात आरोग्य विभागातील ८२ नवीन पदांच्या भरतीस मंजुरी मिळाली असून, यामध्ये शिंगवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील १५, तिरपाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील १५, तळेघर ग्रामीण रुग्णालयातील २६, मलठण ग्रामीण रुग्णालयातील २६ पदांचा समावेश आहे.

शासन निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्थांचे बांधकाम पूर्ण झालेल्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरिता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला असून, ७६ आरोग्य संस्थांकरिता एकूण ५०६ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ६९९ मनुष्यबळ सेवा संख्येच्या‌ मर्यादेत बाह्ययंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेण्यास, आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू करण्यास व नव्याने पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या पदनिर्मितीसाठी मान्यता देण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांना अद्ययावत आरोग्य सेवा मिळणार आहे.
- विवेक वळसे-पाटील, माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest District Marathi News Nid22a00106 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top