पाटबंधारे विभागाने ठेवले ढापे सुरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटबंधारे विभागाने ठेवले ढापे सुरक्षित
पाटबंधारे विभागाने ठेवले ढापे सुरक्षित

पाटबंधारे विभागाने ठेवले ढापे सुरक्षित

sakal_logo
By

निरगुडसर, ता.२५ : वळती- नागापूर (ता.आंबेगाव) गावांदरम्यान मीना नदीवरील असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील सुमारे सात लाख २८ हजार रुपये किमतीचे ९१ ढापे चोरट्यांनी लंपास केले होते. त्याचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध होताच, पाटबंधारे खाते खडबडून जागे झाले आहे. उर्वरित ८४ ढाप्यांची चोरी होऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाने ढापे सुरक्षित ठिकाणी हलवले आहेत.

वळती - नागापूर येथील मीना नदी वरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला पाणी अडवण्यासाठी एकूण १७५ ढापे असून त्यातील ९१ ढाप्यांची चोरी गुरुवारी (ता.२१ ) मध्यरात्री झाली. याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, सामाजिक कार्यकर्ते धोंडिभाऊ भोर आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी पाहणी केली व याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाला दिली. चोरीचे वृत्त प्रसिद्ध होताच पाटबंधारे विभागाकडून शिल्लक राहिलेले ८४ ढापे शनिवारी (ता.२३) सुरक्षितस्थळी मानवी वस्तीजवळ हलवले आहेत.

पाटबंधारे विभागाकडे कर्मचारी कमी असल्यामुळे बंधाऱ्यावरील ढापे देखभाल होण्यास अडचणी येत आहेत. तरी बंधारा, नदीपात्रांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी शेतीपंप असून सर्व त्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी देखील चोऱ्या रोखण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे.
- सुनील दाते, मीना नदी सिंचन शाखाधिकारी

00271

Web Title: Todays Latest District Marathi News Nid22a00123 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top