जिल्ह्यातील १२९ गावे हागणदारीमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील १२९ गावे हागणदारीमुक्त
जिल्ह्यातील १२९ गावे हागणदारीमुक्त

जिल्ह्यातील १२९ गावे हागणदारीमुक्त

sakal_logo
By

निरगुडसर, ता. २९ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या स्वातंत्र्य दिनी पुणे जिल्ह्यातील १२९ गावे हागणदारीमुक्त अधिक होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा दोनची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या अभियानाअंतर्गत वैयक्तिक सार्वजनिक व संस्थात्मक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून गाव स्तरावर घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन करून गावे हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यात येतात. त्यानुसार जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम मोहीम स्वरूपात सुरू करून कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत कुटुंब व सार्वजनिक ठिकाणी शोषखड्डे मनरेगा अंतर्गत बांधलेले आहे.
हागणदारीमुक्त अधिक निकषांची पूर्तता होत असलेल्या १३ तालुक्यातील १२९ गावांची निवड करून येत्या स्वातंत्र्यदिनी गावे हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यात येत आहे, यापूर्वी सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील ३१५ गावे हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यात आलेली आहेत.
जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावे मार्च २३ पर्यंत हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यात येणार आहे. याकरिता गाव स्तरावर ज्या कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नाही अशा कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे. तसेच गावातील सर्व संस्थात्मक ठिकाणी शौचालयाची सुविधा निर्माण करणे. सर्व शाळा अंगणवाडी येथे शौचालयाची उभारणी करून वापरात आणणे तसेच गाव स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करून सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत शोषखड्डा व इतर कामे पूर्ण करून आपले गाव हागणदारीमुक्त अधिक करावयाचे आहे.
हागणदारीमुक्त अधिकच्या निकषांची पूर्तता संबंधित गावांनी करून घ्यावी व ग्रामसभेमध्ये याबाबत विषयावर चर्चा करून ठराव करावे. असे आवाहन, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व गावांना केले आहे.

हागणदारीमुक्त अधिक तालुकानिहाय गाव संख्या
आंबेगाव : ००
बारामती : १०
भोर : १०
दौंड. : १०
हवेली. : १०
इंदापूर : १०
जुन्नर : १२
खेड : १४
मावळ : १०
मुळशी : १०
पुरंदर : १०
शिरूर : १५
वेल्हा : ०८
एकूण : १२९

Web Title: Todays Latest District Marathi News Nid22a00124 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..