जाधववाडीत आढळला बिबट्याचा मृत बछडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाधववाडीत आढळला
बिबट्याचा मृत बछडा
जाधववाडीत आढळला बिबट्याचा मृत बछडा

जाधववाडीत आढळला बिबट्याचा मृत बछडा

sakal_logo
By

निरगुडसर, ता. ३१ : जाधववाडी (ता. आंबेगाव) येथील शेतात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. या बछड्याच्या गळ्याला जखमा आढळून आल्याने भांडणात मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
जाधववाडी येथील गावठाणाजवळ दत्त मंदिराजवळ श्‍याम सुरेश भोर यांची शेती आहे. बुधवारी (ता. ३१) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेश्मा श्‍याम भोर या शेतात भेंडी तोडण्यासाठी गेल्या असता त्यांना बछडा मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे त्या घाबरल्या. त्यांनी घटनेची खबर पोलिस पाटील योगेश जाधव यांना दिली. त्यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. साधारण पाच महिन्याचा या नर बछड्याच्या गळ्याला जखमा आढळून आल्याने झटापटीतच मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. या परिसरात उसाचे क्षेत्र सर्वाधिक असून, शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन देखील झाले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Nid22a00137 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..