शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला
शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला

शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला

sakal_logo
By

निरगुडसर, ता. ८ : ओढ्याच्या पात्राच्या कडेला असलेल्या कांदा बराकीत पाण्याचा प्रवाह शिरल्याने बराकीतील अंदाजे १०० ते १५० पिशव्या कांदा वाहून गेल्यामुळे वळती (ता. आंबेगाव) येथील नरहरी शिंदे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. कांदा पिकास बाजारभावात वाढ होईल, अशा आशेने शिंदे यांनी कांदा बराखीत साठवून ठेवला होता.मात्र अचानक झालेल्या मुसळधार पावसाने कांदा वाहून गेल्याने शेतकरी शिंदे यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.
तसेच, वळती येथील शेतकरी बन्सी अजाब यांचा गाईंचा गोठा रात्री अवकाळी पावसाने पडून गोठ्यातील ४ गायी जखमी झाल्या आहेत. वळती व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून शासनाने भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Nid22a00147 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..