सभापतींचा फोन येताच बसविले रोहित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभापतींचा फोन येताच बसविले रोहित्र
सभापतींचा फोन येताच बसविले रोहित्र

सभापतींचा फोन येताच बसविले रोहित्र

sakal_logo
By

निरगुडसर, ता.२७ : रांजणी (ता.आंबेगाव) येथील गेल्या चार महिन्यांपासून कृषी पंपांना वीज पुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त होते. शेतकऱ्यांनी अनेक वेळा अर्ज केले, हेलपाटे मारले तरी काही दुरुस्ती होईना. थकबाकीही भरली तरी देखील महावितरण अधिकारी रोहित्र बसवेनात. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांचा एक फोनवर अवघ्या २४ तासात महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि मंगळवारी (ता. २७) नवीन रोहित्र बसविण्यात आले.
चार महिन्यापासून बंद अवस्थेत असलेले रोहित्र शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी करूनही महावितरणकडून बसविले जात नव्हते. वीज बिलाची थकबाकी असल्यामुळे रोहित्र बसणार नाही अशी भूमिका महावितरणने घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्यापूर्वी सर्व थकबाकी भरून देखील महावितरण रोहित्र बसवण्यास टाळाटाळ करत होते. या मुळे शेतकरी त्रस्त झाले होते. शेवटी सोमवारी (ता. २६) शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांची भेट घेऊन याबाबत आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर निकम यांनी याची तातडीने दखल घेत त्याच जागेवरून संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून रोहित्र तातडीने बसवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर महावितरणकडून तातडीने रोहित्र बसवण्यात आले अन्‌ कृषी पंपांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू झाल्याने विशाल भोर, किसन भोर सुदर्शन भोर, किरण भोर ,मोहन भोर आदी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

00363